ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षण महर्षी डॉ. अशोक जिवतोडे यांना राष्ट्रसंत पुण्यतिथी साहित्य विशेषांक भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      मानवतेचे महान पुजारी, थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५७ वी पुण्यतिथी तथा सर्व संत स्मृती मानवता दिन देशविदेशातील लाखो श्रीगुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र गुरूकुंज आश्रम येथे नुकताच संपन्न झाला. गुरूकुंज आश्रम येथील श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाच्या वतीने या निमित्ताने पुण्यतिथी साहित्य विशेषांक प्रकाशित करण्यात आला . हा विशेषांक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी शिक्षणमहर्षी डॉ. अशोक जिवतोडे यांना सस्नेह भेट दिला.

      सदर पुण्यतिथी विशेषांक वाचनीय असून या विशेषांकातील अमोल असे विचारधन ग्राम परिवर्तनाच्या कार्यास अधिक गतीमान करणारे असल्याचे मत डॉ. जिवतोडे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी याप्रसंगी श्री गुरुदेव मासिक विभागाच्या कार्यास धन्यवाद दिले.

   या विशेषांकाच्या निर्मितीसाठी श्रीगुरुदेव वाड्.मय विभागाचे समिती प्रमुख व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये