ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   मा. श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन कारंजा(घा.) हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपणीय माहिती मिळाली कि, दुर्गा नगर वार्ड नं. 01 कारंजा(घा.), येथे राहणारी श्रीमती कमल सोनी नावाची महिला हि गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत आहे, अशा माहितीवरून पथकाने नमुद महिलेचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, नमुद महिला व गांजा खरेदी करण्याकरीता आलेला ईसम क्रिष्णा मिसरीलाल कंजर, रा. पोलीस चौकी मागे वार्ड नं. 15 इतवारा बाजार वर्धा असे हजर मिळुन आले, झडती दरम्यान त्यांचे ताब्यातुन गांजा अंमली पदार्थ व गांजा खरेदी करण्याकरीता आणलेली नगदी रक्कम मिळुन आली. सदरचा गांजा हा नमुद महिला आरोपीतास तिचा जावई गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार सुजीत सोनी रा. कारंजा(घा.), याने आणुन दिला असुन, क्रिष्णा कंजर हा आरोपी श्रीमती संगिता कंजर, रा. इतवारा बाजार वर्धा हिचेकडे काम करीत असुन, तिचे सांगणेवरून गांजा खरेदी करीत असल्याचे निष्प्पन्न झाल्याने, मोक्कावर मिळुन आलेल्या दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन 3 किलो 145 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, एक अॅक्टिव्हा मोपेड क्र. MH-32/AY-8320, एक टि.व्ही.एस ज्युपीटर मोपेड क्र. MH-32/AB-9708 नगदी 51,000 रू रक्कम व 02 मोबाईलसह जु.कि. 3,04,900 रू चा मुद्देमाल जप्त करून, सर्व आरोपीतांविरूध्द पो.स्टे. कारंजा(घा.) येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, निलीमा उमक, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये