ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमराई वॉर्डातील १६८ प्रभावित कुटुंबांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : अमराई वॉर्डात तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनात बाधित १६८ कुटुंबांच्या न्याय व पुनर्वसनाच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला आता स्थानिक संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे.

गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, घुग्घुस यांनी या उपोषण आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. या प्रसंगी संघटनेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या समर्थन पत्रात नमूद करण्यात आले की, प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत फक्त आश्वासने दिली आहेत; परंतु ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत — ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

समर्थन पत्रात म्हटले आहे की, शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे प्रभावित कुटुंबांच्या न्यायासाठी सुरू असलेले आमरण उपोषण हे प्रशंसनीय, धाडसी आणि जनहिताचे पाऊल आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस या आंदोलनासोबत ठामपणे उभी असून, प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस घुग्घुसचे अध्यक्ष शरद राजेशकुमार, महासचिव गोविंद रमेश गोगला, उपाध्यक्ष प्रितम नागुलवार, कार्यकर्ते प्रेमराज निचकोला, आकाश दुर्गे, ओम दांडवे, शिवम सिंग, हरीश कोंडागुर्ला, श्रीकांत गोमांसे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विश्वास व्यक्त केला आहे की हे आंदोलन लवकरच यशस्वी होईल आणि अमराई वॉर्डातील सर्व १६८ प्रभावित कुटुंबांना न्याय व पुनर्वसन मिळेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये