ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दिव्यांगांनी कागदपत्रे त्वरित जमा करावीत _ तहसीलदार वैशाली डोंगरजाळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग (अपंग) लागर्थ्यांना शासनाने अडीच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र, अपडेट केलेले आधार कार्ड, बँक पासबुक सर्व कलर (रंगीत)छायांकित प्रत संजय गांधी निराधार विभाग तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे तत्काळ जमा करावे. असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.