सावली तालुक्यातील बोगस नावे मतदार यादीतून वगळा
सावली तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणच्या मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत अनेक व्यक्तींची प्रत्यक्ष गावात न राहता आपली नावे नोंदवली आहेत.रहिवासी असल्याबाबतचा कोणताही पुरावा अनेकांनी जोडलेला नाही गावचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी यांचा रहिवासी असल्याबाबतचा कोणताही पुरावा न जोडता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते त्यामुळे जे व्यक्ती त्या गावातील मूळचे रहिवासी नाहीत अशा व्यक्तींचे नावे मतदार यादी समाविष्ट होणे लोकशाही शासन व्यवस्थेसाठी हानिकारक आहे.
त्यामुळे पूर्ण मतदार यादीची शहानिशा करूनच मतदार यादी अंतिम करावी जोपर्यंत बोगस मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही तोपर्यंत अंतिम मतदार यादी प्रकाशित करू नये अशी मागणी तहसीलदार सावली यांचेकडे सावली तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई, माजी शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार,माजी उपसभापती राजेंद्र भोयर,चिखलीच्या सरपंच रेखा बाणबले,चारगावच्या सरपंच ज्योती बहिरवार,जेष्ठ पदाधिकारी नानाजी तावाडे, प्रकाश घोटेकर,दिपक जवादे,रवी डोहने,चंद्रकांत संतोषवार,नगरसेवक सचिन संगीडवार,प्रीतम गेडाम,गुणवंत सुरमवार,युवा पदाधिकारी डोमा शेंडे,श्रीकांत बहिरवार,वामन भोपये,आकाश खोब्रागडे,कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.