वाचन संस्कृती जिवंत ठेवणे काळाची गरज _ गोविंदराव अहिरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, स्व.सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली, अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे माजी अध्यक्ष गोविंदराव अहिरे होते, सर्वप्रथम अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि तीच वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले, वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, प्रकाश अहिरे, प्रा अशोक डोईफोडे, किरण धुमाळ, गोविंदराव बोरकर यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी,अरुण सपाटे,मधुकरराव धुळे,पंडितराव पाथरकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश खांडेभराड यांनी केले व आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.