डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तरुण युवकांचे प्रेरणास्थान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे दि. 15 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर “युवांसाठी कलामांचे विचार” या विषयावर माहितीपर सत्र घेण्यात आले. रासेयो स्वयंसेवकांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवास, त्यांचे विज्ञानातील योगदान आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेले प्रेरणादायी विचार यावर मनोगते सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन म्हणजे कर्तृत्व, प्रामाणिकता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. जाधव, प्रा. जायभाये, प्रा.सोळंकी, प्रा.शेळके , विद्यार्थी आणि रासेयो स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.