ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे विधानसभा काँग्रेसची निवडणूकपूर्व आढावा बैठक

कोरपना आणि जिवती तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :– येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक जेष्ठ नागरिक सभागृह, गडचांदूर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडली.

        बैठकीत जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे निरीक्षक हैदर अली दोसानी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, काँग्रेस पक्ष हा जनतेच्या मनात रुजलेला पक्ष आहे. येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा, कामगिरी आणि जनकल्याणकारी भूमिका पोहोचवावी तसेच विधानसभेत मत चोरी व याद्यांमधील घोळ यामुळेच आपले पराभव झालेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मत चोरी ला आळा घालणे, याद्यांमध्ये असलेला घोळ, मतदार नागरिकांशी संवाद अशा सर्व बाबींवर जागृत राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले.

        यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, आदिवासी नेते भिमराव मडावी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, सभापती अशोकराव बावणे, विठ्ठलराव थिपे, गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, हंसराज चौधरी, गडचांदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, नगरसेवक विक्रम येरणे, नितीन बावणे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, कोरपना तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा आशाताई खासरे, जिवती महिला तालुका अध्यक्षा नंदाताई मुसणे, किरणताई एकरे, सुरेश मालेकर, महादेव हेपट, उमेश राजुरकर, भाऊजी चव्हाण, विवेक येरणे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये