ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहाय्यक संचालक (हिवताप)यांची जिवती तालुक्याला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आदिवासी बहुल, डोंगराळ, अति दुर्गम, आकांशीत जिवती तालुक्याला नागपूर येथील सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ.नयना दु पारे मॅडम यांनी तालुक्यातील हिवताप,हत्तीरोग, डेंगू ,चिकनगुनिया आदी आजाराच्या आढावा घेण्याच्या संदर्भाने दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी भेट दिली.

सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे भेट देऊन सन 2025 मधील हिवतापाची सद्यस्थिती जाणून घेतली. सन 2024 मध्ये जिवती तालुक्यात एकूण 253 हिवताप पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यापैकी हिवतापाच्या मेंदूजवर प्रकारातील 244 तर, साध्या हिवतापाचे प्रकारातील नऊ हिवताप दूषित नऊ होते. मागील वर्षी 30 सप्टें 2024 पर्यंत 208 पॉझिटिव्ह रुग्ण होते त्याच्या तुलनेत यावर्षी माहे सप्टेंबर पर्यंत 28 च पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

आजमीतिला 2025 मधे तालुक्यात एकूण 42 हिवताप दूषित रुग्ण आढळून आले असून, जीवती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 38,पाटण 1 व शेनगाव मध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत रुग्णांची झालेली लक्षणीय घटीबाबत मा.सहाय्यक संचालकांनी तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बद्दल समाधान व्यक्त केले.

तालुक्यातील नगराळा उपकेंद्रातील मारुती गुडा, नानक पठार, काकबन, रायपूर,खडकी,कलिगुडी ,लेंडीगुडा गड पांढरवणी, गोंडगुडा या जंगल बहुल भागात हिवतापाचे रुग्ण आढळून येत आहेत. सदर गावांमध्ये हिवताप प्रतिबंधात्मक करावयाच्या उपायोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर भेटी दरम्यान नगराळा नानक पठार ,मारुती गुडा, या गावांना सहाय्यक संचालक हिवताप यांनी प्रत्यक्ष भेट दिली .त्यांच्या नागपूरवरून आलेल्या चमू मध्ये त्यांच्या कार्यालयातील आरोग्य सहाय्यक श्री चिकटे, विभागीय कीटक शास्त्रज्ञ श्री सचिन लकारे, कीटक संहारक श्री मुदाणकर, जिल्हा हिवताप कार्यालयातील जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक श्री.जोशी, कीटक शास्त्रीय सल्लागार श्री धनवर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे हजर होते.

हिवतापाचे प्रमुख लक्षणे ताप येणे ,अंगदुखी असणे, एक दिवस आड ताप येत राहणे, घाम येणे, अंग थंडगार होणे इत्यादी लक्षणे महत्त्वाचे असतात म्हणून डासाच्या चाव्या पासून स्वतःचे रक्षण करणे, डास होऊ न देणे याकरिता डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे करिता कोरडा दिवस पाडणे, मच्छरदाणीचा वापर करणे , व हिवतापाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्त देऊन समुळ उपचार करून घ्यावा.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रकाश साठे यांच्या मार्गदर्शनात जिवती तालुक्यातील हिवताप आजारांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना सुरू असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी जिवती डॉ स्वप्नील टेंभे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये