ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवा सेनेच्या लोकसभा सचिव पदी सुरज शहा यांची तर जिल्हा संघटक पदी सुमित हस्तक यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युवासेनेच्या लोकसभा सचिव पदी सुरज शहा यांची तर जिल्हा संघटक पदी सुमित हस्तक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा संघटक सुमित हस्तक यांचेकडे वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा कार्यभार देण्यात आला आहे. सदर नियुक्ती युवा सेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे, कार्याध्यक्ष पूर्वेश दादा सरनाईक, पूर्व विदर्भ सचिव शुभम दादा नवले, प्रदेश सदस्य हर्षल शिंदे, जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नियुक्ती झाल्याबद्दल उभयतांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.