ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अकोला जिल्ह्यातील एकता संघाने पटकावला ‘इकबाल चषक’

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप : नागरिकांची क्रीडा संकुलात तुफान गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्हा क्रीडा संकुलात आठे ११ फेब्रुवारी दरम्यान चार दिवस ‘इकबाल चषक’ राज्यस्तरीय फुटबॉल सामन्यांचे आयोजन इकबाल भाई मित्र परिवार आणि पोलिस बॉईज मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेत अकोला येथील एकता एफसी संघाने दारव्हा येथील ज्वाला क्रांती संघावर मात करीत ‘इकबाल चषक’ पटकावला. इकबाल खान हे हॉकी फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू होते. मागील वर्षी अल्पशा आजाराने त्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये एकूण विविध जिल्ह्यातील १५ संघांनी सहभाग घेतला होता. ११ रोजी स्पर्धेचा अंतिम सामना अकोला एकता एफसी संघ आणि दारव्हा येथील ज्वाला क्रांती संघात होता. सामना सुरु असतानाच मुसळधार पाऊस आल्याने सामना दोनदा मधातच थांबवावा लागला. अखेर दोन्ही संघांना समान गुण असल्याने सामना टायब्रेकरवर पोहचला. यात अकोला संघ ४ विरुद्ध ३ गोलने विजयी झाला.

अंतिम सामन्याचा रोमांच अनुभवण्यासाठी झुंड सिनेमा ज्यांच्यावर निर्मित करण्यात आला ते अखिलेश पॉल, सचिन अग्निहोत्री, माजी खेळ प्रशिक्षक भोंगे, प्रकाश अग्रवाल, किशोर भोयर, पोलिस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष किशोर ढोणे तसेच स्व. इकबाल भाई यांच्या परिवारातील व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात वर्धा फुटबॉल संघ विरुद्ध दारव्हा असा सामना झाला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघातील गोलकिपर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिसरे बक्षीस उस्मान आझाद संघाला देण्यात आले. तर चौथ्या स्थानावर वर्धा संघाला पुरस्कृत करण्यात आले.

यशस्वीतेसाठी किशाेर खैरकार, आशिष बाभुळकर, सईदभाई, रियाज भाई, सलाम कुरेशी, सतीश दरवरे, मोहन उमाटे, जावेदभाई, नरेश खोडमारे, दिनेश बोथकर, प्रमोद खडकाळ, अनुप कावळे आदींनी परिश्रम घेतले.

भर पावसात लुटला रोमांचक सामन्यांचा आनंद

११ रोजी रविवारी अंतिम सामन्यादरम्यान वादळी पावसाला सुरूवात झाली. मात्र, हजारोंच्या संख्येने सामना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घरी न जाता भर पावसात रोमांचक सामन्याचा आनंद लुटला. अकोला संघातील तीन विदेशी खेळाडूंनी देखील वर्धेकरांचा उत्साह पाहून आश्चर्य व्यक्त करीत आभार मानले.

‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरला ‘जॉर्ज’

चार दिवस चाललेल्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज हा किताब अकोला एकता एफसी संघातील खेळाडू जॉर्ज याने पटकावला. त्याला स्पोर्ट सायकल, एक ट्राॅली बॅग, बक्षीस तसेच मॅन ऑफ द मॅच अकोला संघाच्या गोलकिपरने पटकावला. या दोघांनाही सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे विजयी आणि पराजित झालेल्या दोन्ही संघांतील खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कारांची मेजवानी

प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये सचिन अग्निहोत्री यांच्यातर्फे देण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार मुन्ना सिद्दीकी यांच्याकडून ३१ हजार रुपये तसेच तृतीय पुरस्कार २१ हजार रुपये इकबाल मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आला. मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार विंग्ज अकॅडमी, गौरव नलोडे यांच्यावतीने देण्यात आला. मॅन ऑफ द मॅच पोलिस बॉईज असोसिएशनचे किशोर ढोणे यांच्यावतीने देण्यात आला.बेस्ट गोलकिपर वैभव काशिकर यांच्याकडून, बेस्ट मिडफिल्डल शिवा बिल्डर्सचे आशिष तिवारीकडून, बेस्ट फॉरवर्ड महेश गुल्हाणे यांच्याकडून, इमजिंग यंग प्लेअर इक्बालभाई मित्र परिवारातर्फे देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये