ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाणी पुरवठा योजनेच्या विकासकामांची जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी

चांदा ब्लास्ट

मुल तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या. यावेळी मुलच्या तहसीलदार मृदुला मोरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी मुल नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी जल शुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया तसेच संबंधित योजनेकरीता लागणारा विद्युत भार याबाबत माहिती घेतली. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत येणाऱ्या बोरचांदली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर नव्याने बसविण्यात आलेल्या पारेषण संलग्न सौर विद्युत सयंत्रांची पाहणी केली. तसेच संबंधित योजनेतून पाणी पुरवठा होत असेलल्या गावांची माहिती घेतली.

  सौर विद्युत सयंत्राबाबतची सध्यस्थिती तसेच योजना चालविण्याकरिता लागणारी सयंत्रेची क्षमता जाणून घेऊन, उर्वरित काम वेळेत पूर्ण करून सौर उर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत येणाऱ्या २४ ग्रीड मुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर नव्याने बसविण्यात आलेल्या पारेषण संलग्न सौर विद्युत सयंत्राचीसुध्दा त्यांनी पाहणी केली. २४ ग्रीड मुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही शिखर समिती मार्फत चालविण्यात येत असून योजनेवरील कामगारांना कामाबाबत तसेच योजना देखभालबाबत विचारणा केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये