जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारगाव येथे बाल मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारगाव (खु) येथे ९ ऑक्टोंबर रोजी बाल मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये आकाश कंदील, कागदी टोप्या, टोपली अशा अनेक वस्तू बनविण्यात आले. गाणे गोष्टी घेण्यात आल्या.
बाल मेळाव्याचा एकंदरीत उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. आणि त्यांच्या मध्ये असलेल्या कलागुणांचा विकास करणे हा मुख्य हेतू होता.
सदर बाल मेळावा हा अंबुजा सिमेंट लिमिटेड च्या CSR उपक्रमांतर्गत अंबुजा फाउंडेशन शिक्षण विभागाच्या समन्वयक सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बाल मेळाव्याचे आयोजन कम्युनिटी मोबेलायझर हर्षाली खारकर, पुस्तकपरी संजीवनी पेरगार, पपीता भसारकर, पोर्णिमा डोईफोडे, शैला मडावी, देवूताई सीडाम, फुलाताई सिडाम यांनी केले.
शाळेतील मुख्याध्यापक श्री सुरेश बल्की,धनकदेवी शाळेचे शिक्षक श्री उल्हास पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन पाटील पेंदोर, गावातील पोलिस पाटील श्री देविदास पेंदोर, अंगणवाडी सेविका कांताबाई पेंदोर, पालक तुळसाबाई मेश्राम, मायाबाई कलाम, लक्ष्मी उइके, ललिता पंधरे, पूनम पेंदोर आरोग्य सखी नवनीता सिडाम आणि एकूण ५२ विद्यार्थी उपस्थित होते.