ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांगापूर येथे प्रवीण महाजन यांच्या घरी पोर्च मध्ये आढळला चार फूट लांबीचा परड

परड सापाला दिले जीवदान देताना सर्प मित्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर  येथे वॉर्ड  नंबर दोन मध्ये प्रवीण शंकर महाजन यांच्या घरी पोर्च मध्ये चक्क चार फुटाचा लांब विषारी परड बेडूक खात होता स्टाईल वर प्रवीण महाजन यांना दिसताच सर्पमित्र,आनंद सिंग टाक, विशाल दिवे,शुभम महाजन,सर्प मित्र यांना फोन करून बोलाऊन परड सापाला स्टिक च्या साहाय्याने पकडले परड सापाबद्दल सर्पमित्र यांनी माहिती दिली. हा विषारी परड आहे, चावल्यावर माणूस मरतो किंवा विष जरी उडले  तर घातक आहे, परड नी पाय सुजते, अशे त्यांनी सांगितले सापाला  पाहण्यासाठी गावकरी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंतर सर्प मित्रांनी  परड सापाला जंगल भागात नेऊन सुखरूप सोडून दिले, वॉर्ड नंबर दोन मध्येच रमेश कुडमते यांच्या घरा जवळ मात्र  त्या ठिकाणी दुसरा चक्क विषारी  गवाऱ्या  जातीचा साप रस्तावर दिसल्याने खळबळ,उडाली  ऐकाचा ठिकाणी दोन असल्याने नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.प्रमोद सावज,अविनाश शिरसागर,रमेश कुडमते,विजय शेंडे,सचिन महाजन,शुभम सावज  होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये