गांजा विक्रेत्यावर देवळी पोलिसाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वायगाव येथे राहणारा शाहबाज रफीक काजी वय 30 वर्ष हा चोरून लपून गांजा विक्री करतो अशी माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमावर पाळत ठेवून माहितगार लावून ठेवले असता आज रोजी त्याच्या घरी गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगुन आहे अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीती वरून त्याच्या घराची झडती घेतली असता,आरोपी च्या घरझडतीमध्ये एका काळ्या रंगाच्या बँग मध्ये 02 किलो 800 ग्राम हिरवट काळपट रंगाची पाने,फुले,देठ,कळया व बिया असलेली ओलसर वनस्पती गांजा नावाचा अंमली पदार्थ एका पांढ-या रंगाचे प्लाँस्टीक मध्ये भरुन असल्याचे मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातुन 02 किलो 800 ग्राम गांजा प्रति किलो 250000 प्रमाणे 70,625/-रु चा* मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध एन.डी.पि.एस अँक्ट प्रमाणे कार्यवाही करुन आरोपीस अटक करून पुढील कार्यवाही देवळी पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री.अनुराग जैन मा.अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, श्री सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल मंडळकर ठाणेदार पोलीस स्टेशन देवळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निमजे, पोहवा अमोल अलवडकर, स्वप्निल वाटकर, मनोज नप्ते, नितेश पाटील कैलास पेटकर, यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजीभीये करीत आहे.