शासकीय औ. प्र. संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचे उद्घाटन तथा पदवीदान कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील सिपेट सभागृहात पहिल्या सत्रात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यात विविध व्यवसायातून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एकूण सहा औद्योगिक आस्थापनांनी १५७ उमेदवाराची नोंदणी व मुलाखती घेऊन त्यापैकी ५३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनात गटनिदेशक हितेश नंदेश्वर यांनी भरती मेळाव्याचे नियोजन केले होते.
दुसऱ्या सत्रात अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम तथा कौशल्य दीक्षांत कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आँनलाईन पध्दतीने प्रशिक्षणार्थांना शुभेच्छा दिल्यात. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर अल्पकालीन रोजगारक्षम या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आ. सुधाकरजी अडबाले, विश्वकर्मा लाभार्थी सौ. ममता राजू मोलगुरू , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अनिसा तडवी, डॉ . हेलवटे आदींची उपस्थिती होती.
संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगीरवार यांनी प्रास्ताविकातून कौशल्य विकासाचे महत्त्व विषद करून यशस्वी प्रशिक्षणार्थांचे कौतुक केले. तर आ. सुधाकर अडबाले म्हणाले की, आय. टी. आय चे प्रशिक्षण प्राप्त करणे म्हणजे उद्योग जगतात आपले स्थान निर्माण करण्याची सुवर्णसंधी आहे, असे ते म्हणाले.
या पदवीदान समारंभात संस्थेतील २२ व्यवसायाच्या गुणानुक्रमे एकूण ६६ प्रशिक्षणार्थांना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह देऊन अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन निदेशिका अनिता ढेंगेकर यांनी केले तर आभार निदेशिका रंजना ढाकणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गटनिदेशक, निदेशक, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.