जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा केला सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेरही जायंटस वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने आपली पाळे मुळे घट्ट रोवली असून फेडरेशन दोन ब मध्ये जे ग्रुप कार्यरत आहेत त्या ग्रुपमधील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी एक जानेवारी 25 ते 30 सप्टेंबर 25 या कालावधीत आपल्या क्षेत्रात जे सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कामे केली.
त्या ग्रुपला व वैयक्तिक पदाधिकाऱ्यांना दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजी नगर मध्ये आयोजित तिसऱ्या कौन्सिल मिटिंग मध्ये जायंट्स चे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी ,छत्रपती संभाजी नगरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन जीवन राजपूत ,एडवोकेट अशोक देवरे फेडरेशन अध्यक्ष गुरुदत्त राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके वितरित करण्यात आली यावेळी डॉक्टर जीवन राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या क्षेत्रात उत्तम काम करत असतो मात्र जेव्हा त्याचे मूल्यमापन होऊन पारितोषिक देण्याची वेळ येते त्यावेळी प्रत्येकाला पारितोषिके मिळत नाही त्याचा अर्थ हा नाही की आपण कुठेतरी कमी पडलो सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यातूनच खरा सामाजिक कार्यकर्ता घडतो असे सांगितले.
संपूर्ण भारतात व भारताबाहेर सुद्धा जायंट्स वेलफेअर फाउंडेशनने विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, अध्यात्मिक, पर्यावरन विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे दरवर्षी जायंट्स इंटरनॅशनल अधिवेशनात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान होत असतो तर फेडरेशन निहाय काम करणाऱ्या ग्रुपचा व फेडरेशन पदाधिकाऱ्यांचा सन्मान होत असतो फेडरेशन 2 B ने दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी तिसऱ्या कौन्सिल मिटींगचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले होते.
यावेळी मंचकावर स्पेशल कमिटी मेंबर सूर्यमाला मालानी, विनोद शेवतेकर संजय गुगळे, जगन्नाथ साळुंखे, फेडरेशन अध्यक्ष प्रा. गुरुदत्त राजपूत सचिव रंजना भावसार प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर जीवन राजपूत ऍडव्होकेट अशोक देवरे उपस्थित होते या सभेमध्ये ज्या ज्या ग्रुपने जानेवारी 25 ते सप्टेंबर 25 या कालावधीत आपापल्या क्षेत्रात काम केले त्याचे सविस्तर वाचन करण्यात आले व उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रुपला व काही पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली युनिट 3 मधून उत्कृष्ट वृत्त संकलन करून त्यास प्रसिद्धी दिल्याबद्दल पत्रकार तथा फेडरेशन डायरेक्टर सन्मतीजैन यांना सन्मानित करण्यात आले.
या सभेमध्ये 49 पारितोषिके वितरण करण्यात आली फेडरेशन अवार्ड नंतर आता इंटरनॅशनल कडून अवॉर्ड मिळण्यासाठी सर्व ग्रुप प्रयत्नशील असल्याचे दिसून आले या सभेत फेडरेशनचे उपाध्यक्ष रत्नाकर महाजन, जुगलकिशोर हरकुट फेडरेशन डायरेक्टर सन्मतीजैन, संतोषी भालेराव तर युनिट ऑफिसर म्हणून आरती बियाणी, संजय खिल्लारे, दिनेश सावजी, अनघा आंबेकर, श्रीनिवास कोंडले उपस्थित होते संचलन रत्नाकर महाजन तर आभार संतोषी भालेराव यांनी मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.