सरन्यायाधीशांवर चप्पल फेकल्याच्या घटनेचा काँग्रेसकडून निषेध
चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन

चांदा ब्लास्ट
देशाचे सरन्यायाधीश मा. बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकिलाने चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी पुतळा, जटपूरा गेट येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “न्यायसंस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे” अशा घोषणा देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी प्रवीण पडवेकर, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सुनंदाताई धोबे, चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुभाषसिंग गौर, सोहेल शेख, रोशन लाल, राजेश अडूर, शफक शेख, रामकृष्ण कोंडरा, ऊषाताई धांडे, अश्विनी खोबरागडे, अमजद अली, विणा खनके, सकीना अंसारी, संगीता पेटकुले, मनोरंजन राय,शिरीन कुरैशी,तवंगर खान, ऍड. प्रितिशा, ऍड. आयेशा शेख, शिरीन कुरेशी, साबिर सिद्दीकी, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोंडाम, भालचंद्र दानव, गोपाल अमृतकर, पिंटू शिरवार, रतन शिलावार, कुणाल चहारे, नौशाद शेख, काशिफ अली, निलेश ठाकरे, दीपक कटकोजवार, मोहन डोंगरे, शिरीष गोगुलवार, मोनू रामटेके, याकुब पठान, राजू वसेकर, राजू खजांची, रोहित पिंपळकर, प्रवीण अडूर, स्वप्निल चिवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.