सनराईझ योगा ग्रुप तर्फे कोजागिरी निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईझ योगा अँक्टिव्हिटी बेनिफिट वुमेन्स ग्रुपच्या माध्यमातून ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी कार्यक्रम घेण्यात आला. यात काही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा अणि पॉपकॉर्न स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये वैशाली पारधी यांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. अणि भारती राठोड यांना पॉपकॉर्न स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला सेवानिवृत्त झालेल्या सत्कारमूर्ती छाया ताई गोखरे मॅडम, लता ताई बोबडे मॅडम आणि श्रीमती संध्याताई निखाडे मॅडम यांचा सत्कार अध्यक्ष सुरेखा ठाकरे, उपाध्यक्ष डाक्टर कृष्णा ठाकरे तसेच ग्रूप संचालिका कुंतल चव्हान मॅडम यांच्या हस्ते. शाल व श्रीफळ देउन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन लीना लांजेकर यांनी केले.आणि आभार प्रदर्शन छाया टोंगे यांनी केले या कार्यक्रमासाठी संचालिका कुंतल मॅडम.आणि सर्व ग्रुप महिला सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.