ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कृउबास रामनगर मुख्य बाजार स्थळावर नविन सोयाबीनची आवक सुरू

चांदा ब्लास्ट
कृषी उत्पन्न बाजार समिती ता. जि.कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूरचे रामनगर मुख्य बाजार स्थळावर दि. ०७/१०/२०२५ रोज मंगळवारला नविन सोयाबीनची आवक सुरू झालेली असुन, भाऊजी माधव काकडे, रा. निमणी ता. कोरपणा जि. चंद्रपूर यांनी नविन सोयावीन ११ पोते विक्रीकरिता आणलेला आहे, यांचे मा. गंगाधर वि. वैद्य, सभापती, संचालक प्रभाकर के. सिडाम यांनी शाल व श्रीफळ देवून स्वागत केले. सदर प्रसंगी वाजार समितीचे अडते, व्यापारी, हमाल-मापारी व शेतकरी बंधु तसेच बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
बाजार समितीचे सभापती गंगाधर वि. वैद्य व सचिव, संजय स. पावडे हे शेतक-यांना नविन सोयाबिन वाळवुन व स्वच्छ करून विक्रीस आणावा असे आवाहन करीत आहे.