ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महामार्ग व अनुकंपा नियुक्ती निर्णयाबद्दल आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

मुंबई मंत्रालयात घेतली भेट

चांदा ब्लास्ट

नागपूर ते चंद्रपूर २०४ किमी लांबीच्या मार्गासाठी 2 हजार ३५३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. तसेच चंद्रपूर ते मूल मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यासह राज्यभरातील १० हजार ३०९ अनुकंपाधारकांना एकाच दिवशी नोकरी देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी आज, मंगळवारी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले आहेत.

विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे 2 हजार ३५३ कोटी रुपयांच्या निधीतून नागपूर ते चंद्रपूर दरम्यानच्या २०४ किमी लांबीच्या चारपदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग विदर्भाच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी नवी दिशा ठरणार आहे.

तसेच, राज्यातील १० हजारांहून अधिक अनुकंपाधारकांना तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील २८५ अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन अनेक कुटुंबांना दिलासा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून प्रशासनात नवा उत्साह निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा विकास निश्चितपणे नव्या उंचीवर पोहोचेल. नागपूर–चंद्रपूर चौपदरी महामार्गामुळे चंद्रपूर क्षेत्रातील वाहतुकीला नवी गती मिळेल, गुंतवणुकीस चालना मिळेल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच, अनुकंपा नियुक्तीच्या निर्णयामुळे शासनाची संवेदनशीलता दिसून येते, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या भेटीत आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये