सावली तालुक्यात सर्पदंशने दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू
सर्वत्र हळहळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पेडगाव माल येथील भाऊजी चिरकुटा भोयर (वय ४०) व प्रफुल ईश्वर चरडुके रा.हरांबा ( वय ३८) या दोन तरुण शेतकऱ्यांचा शेतात काम करीत असतांना सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यामुळे सावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
भाऊजी चिरकुटा भोयर या आपल्या शेतात काम करत असताना अचानक काही तरी चावा घेतल्याचा लक्षात येताच त्यांनी गावात आला व तेथुन सावली ग्रामीण रुग्णालय येथे गेले असता त्याला ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले परंतु काही तासांनंतर. जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे मृत्यू झाला. मृत भाऊजी यांचा मागे पत्नी व दोन मुले आहेत घरातील कर्ता धर्ता पुरुष गेल्याने हळ हळ व्यक्त होत आहे.
दुसरी घटना हरंबा येथील आहे.प्रफुल ईश्वर चरडुके हा शेतकरी दररोज सारखा आजही शेतात काम करीत असतांना त्याला सापाने चावा घेतल्याचे लक्षात आले.त्याने त्वरित माहिती घरच्या मंडळी ला दिली.त्यांनंतर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याचा पाठीमागे पत्नी,२ लहान मुले तसेच भाऊ व बहीण असा मोठा आप्त परिवार आहे.या दोन्ही तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मृत भाऊजी भोयर व प्रफुल चरडुके यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून,आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत देण्यात यावी अशी मागणी उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुका अध्यक्ष सावली यांनी केली आहे.