“इनोव्हेशन महाकुंभ”करिता महिला विद्यापीठ सज्ज
निवडक व्यवसाय संकल्पनांना वित्त पोषणासह राष्ट्रीय स्तरावर मान्यता

चांदा ब्लास्ट
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उपयोग करून रोजगार निर्मिती व्हावी व त्यांच्या व्यावसायिक संकल्पनांना प्रेरणा मिळावी यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,मुंबई व वाधवणी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने “इनोव्हेशन महाकुंभ” चे आयोजन करण्यात येत आहे. यात व्यवसायाकरीता विद्यार्थ्यांकडून विविध संकल्पना आमंत्रित करून निवडक ११० संकल्पनांची प्रदर्शनी महिला विद्यापीठ मुंबई येथे लावली जाणार आहे.
मा. मुख्यमंत्री श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सदर प्रदर्शनी एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई येथे होणार आहे. प्रदर्शनीत सहभागी संकल्पना अभ्यासक्रम व सततपोषणीय विकासाला अनुसरून असाव्या. प्रथम क्रमांकाला ७५ हजार,द्वितीय साठी ५० हजार तर तृतीय करिता २५ हजार या व्यतिरिक्त अन्य उत्तम प्रकल्पांना आर्थिक मदत दिली जाणार.तसेच एखादी संकल्पना सफल व्यवसायात रूपांतरीत व्हावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन वाधवाणी फाउंडेशन तर्फे देण्यात येणार.
इनोव्हेशन महाकुंभात सहभाग घेण्याकरिता महिला विद्यापीठाचे बल्लारपूर केंद्र महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर ही संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्याआर्गदर्शनात होत आहे. प्राध्यापक व विद्यार्थिनींना संकल्पना निर्मिती, स्टार्टअप व व्यवसायाची मूलभूत माहिती व्हावी यासाठी चर्चासत्रे आयोजित केली जात आहे.
७ ऑक्टोबर ला श्री. प्रवीण बच्छाव (संचालक, CPET, चंद्रपूर) यांचे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले प्लॅस्टिक पासून बनणाऱ्या वस्तू व त्यांचा व्यवसाय, वेगवगळी यंत्रे, त्यांची किंमत व अन्य आवश्यक गोष्टींची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.या प्रसंगी आवाराचे संचालक, डॉ.राजेश इंगोले, समन्वयक डॉ.वेदानंद अलमस्त सह सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनींनी ऑनलाईन पद्धतीने या चर्चा सत्रात सहभाग घेतला.