ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या चिमुकल्याचे हात सरसावले दुष्काळग्रस्तच्या मदतीसाठी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ पडला असून अनेक जिल्हे यावेळी बाधित झाले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या गोष्टीचा विचार करून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथील विद्यार्थी मदत करण्यासाठी पुढे सरसावले.जवळपास २५१३ रुपये आज जमा केले.ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत पाठविण्यात येणार आहे. असे आदर्श शिक्षक काकासाहेब नागरे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या शाळेच्या विद्यार्थांनी यापूर्वी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या वेळी मदत पाठविली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये