ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात ८ ऑक्टोंबरला प्राचार्य सभा व चर्चा सत्राचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरम आणि शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 ला गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व प्राचार्यांची प्राचार्य सभा व चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.

या प्राचार्य सभा व चर्चासत्राचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार माननीय सुधाकरराव अडबाले यांच्या हस्ते 11 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले हे भूषविणार आहे.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ.श्रीरामजी कावळे, श्री.मुकेश गहलोत व्हाईस प्रेसिडेंट एच. आर. माणिकगड सिमेंट वर्क्स हे मान्यवर उपस्थित राहतील.तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद काटकर अध्यक्ष प्राचार्य फोरम, डॉ. लालसिंग खालसा,सचिव प्राचार्य फोरम,डॉ. राजाभाऊ मुनघाटे,प्राचार्य गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा,डॉ. एस.एन. बुटे,उपाध्यक्ष प्राचार्य फोरम, डॉ.संभाजी वरकड, सहसचिव प्राचार्य फोरम, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सभेत प्राचार्य यांचे प्रश्न उपाययोजना,शासनाचे धोरण, उच्च शिक्षणातील विविध अडचणी,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय अडचणी इत्यादी विविध विषयावर चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा होणार असून गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व प्राचार्य महोदयांनी या सभेला व चर्चासत्राला उपस्थित राहावे असे आवाहन गोंडवांना विद्यापीठ प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ.प्रमोद काटकर, सचिव डॉ. लालसिंग खालसा, आयोजक आणि प्राचार्य फोरमचे सहसचिव डॉ. संजयकुमार सिंह, महाविद्यालयाचे गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय गोरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये