रविवारला पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन

चांदा ब्लास्ट
पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथील १९९०-९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री श्यामप्रसाद मुखर्जी हॉल, रामाला तलाव रोड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून छोटूभाई पटेल हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. राजीव मानकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला श्री. रवींद्र जवादे सर , श्रीमती तिवारी मॅडम, श्री प्रदीप गर्गेलवार सर आणि श्री. प्रकाश होळंबे सर याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
इयत्ता ५ वी ते १० वी (सन १९८५ ते १९९१) व दहावीच्या १९९०-९१ च्या बॅचचे विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होणार असून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.
माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा नव्हे तर शाळेच्या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.