एस.एन.डी.टी. विद्यापीठात रंगला “नवरात्री गरबा उत्सव”
नवरात्री निमित्त नृत्य स्पर्धा, गरबा– बॉलीवूड फ्युजन हिट !

चांदा ब्लास्ट
देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, रासगरबा प्रेमींसाठी अनेक ठिकाणी गरबा – दांडिया चे कार्यक्रम भरवले जात आहे.एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबईचे बल्लारपूर येथील आवारात सांस्कृतिक विभागातर्फे ३० सप्टेंबर ला “गरबा स्पर्धा” आयोजित करण्यात आली. यात विद्यार्थिनींनी उत्साहाने पारंपरिक वेशभूषेत उत्तम गरबा नृत्याचे सादरीकरण करून परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचा शुभारंभ डॉ. जयश्री शिंदे (अधिष्ठाता,आंतरविद्याशाखा विभाग) यांच्या हस्ते करण्यात आला.सदर स्पर्धा ग्रुप व ड्युएट अशा दोन फेऱ्यात होती. दोन्ही फेरीत उत्कृष्ट प्रदर्शन करून “रास राग” संघाने प्रथम स्थान काबीज केले यात फूड टेक्नॉलॉजी, बी ए इकॉनॉमिक्स व इंटिरिअर डिझाइन च्या विद्यार्थिनींचा समावेश होता.द्वितीय क्रमांक बीएमएस च्या “दांडिया डझलर्स” संघाने पटकावला. सुप्रसिद्ध नर्तिका कु. जिज्ञासा ढाले यांनी स्पर्धेचे समीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले, अतिथी म्हणून श्री.सुरेश राठी (अभियंता), सहायक कुलसचिव डॉ बाळू राठोड व समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त उपस्थित होते. अतिशय कमी वेळेत पोशाख, संस्कृती, परंपरा सर्वांचे भान राखून सादरीकरण केले यासाठी डॉ.राजेश इंगोले यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन सह प्रा. शीतल बिलोरे यांनी हिने केले तर सह प्रा. अश्विनी वाणी यांनी कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या संयोजनात सांस्कृतिक विभाग व प्रत्येकी ग्रुप साठी नेमलेल्या प्रभारी प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.