गांधी जयंती : महिला विद्यापीठात विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
एस एन डी टी महिला विद्यापीठ,बल्लारपूर आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थिनी,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी माल्यार्पण करून दोन्ही विभूतींना वंदन केले.
गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविले गेले. यांत रासेयो स्वयंसेवकांसोबत सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता केली.
थोर नेत्यांची मूल्ये जपता यावी म्हणून दरवर्षी आपण त्यांचे स्मरण करतो. महात्मा गांधी हे सत्य,अहिंसा व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत तर लाल बहादुर शास्त्री कर्तव्य पारायणात शिकवतात. आपणही त्यांची मूल्ये अंगिकारली पाहिजे असे आवाहन डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
या प्रसंगी सह कुलसचिव डॉ बाळू राठोड व समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त तसेच सर्व विद्यार्थिनी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.