ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी सत्य व अहिंसा या तत्वावर चालावे _ मुख्याध्यापक बबन भोयर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या सत्य व अहिंसा या तत्वावर विद्यार्थ्यांनी चालावे असे आवाहन मुख्याधापक बबन भोयर यांनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोनुर्ली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे स्व पंतप्रधान भारतरत्न मा. लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी “भाषण स्पर्धा ” आयोजित केली होती यात विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल मोलाची माहिती सांगितली भाषण स्पर्धेमध्ये दोन गट तयार करण्यात आली होती एक म्हणजे वर्ग 5 वी ते वर्ग 8 वी दुसरा वर्ग 9 वी ते 12 वी .

वर्ग 5 वी ते 8 वी या गटातून प्रथम क्रमांक कु. समीर परसुटकर द्वितीय क्रमांक कु. गौरी लांडगे व तृतीय क्रमांक कु. प्रतीक चिंचोलकर यांना देण्यात आला .

वर्ग 9 ते 12 गटात प्रथम क्रमांक कु सोनिया सोनी, द्वितीय क्रमांक नंदिनी सोनी तर तृतीय क्रमांक यश चटप याने पटकाविला,

परीक्षक म्हणून विश्वनाथ धोटे व अनिल मडावी यांनी कार्य केले.

विजेत्या विद्यार्थ्यांना येडमे सर, व कुंभारे सर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा पत्रकार यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये