ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे गांधी शास्त्री जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे,पमुख्याध्यापक रमेश डाहूले पर्यवेक्षिका माधुरी मस्की, एम सी व्ही सी विभागाच्या प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या. सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, उच्च. माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक दिया रहांगडाले, द्वितीय मैनुद्दीन सैय्यद, तृतीय क्रमांक मेंगराव गेडाम यांनी मिळविला, माध्यमिक गटात प्रथम क्रमांक भूमिका तुराणकर, द्वितीय क्रमांक प्रेरणा जाधव, तृतीय क्रमांक दुर्गेश्वरी गहुकर, चतुर्थ स्थान सोहम सोयाम यांनी मिळविले, पूर्व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक जिद्न्यासा पिंपळकर, द्वितीय क्रमांक मनस्वी परसुटकर, तृतीय क्रमांक आर्या थोरात, प्रोत्साहनपर पुरस्कार जानवी पालीवाल यांना मिळाला,कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन श्री वामन टेकाम यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये