ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जगाला शांततेचे संदेश देणारे खरे महात्मा – रवींद्र मुप्पावार

विश्वशांती विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

अहिंसा, सत्याग्रह आणि सत्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाला “शांततेचे शस्त्र” देणारे खरे महात्मा! त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही मानवतेला दिशा दाखवते असे विचार राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती दिनाच्या निमित्याने अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला सूत माला अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली आणि त्यानंतर महात्मा गांधी यांना आवडत असलेली भजने, सर्वधर्म प्रार्थना,रामधून,शांतिपाठ स्थितप्रज्ञाची लक्षणे विद्यालयाच्या शिक्षकांनी सादर केले.आयोजित कार्यक्रमाला शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये