नांदाफाटा येथे महाराष्ट्रातील नंबर 1 ची संस्था सक्सेस अबॅकस सेंटरचे थाटात उदघाट्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील ओदयोगिक नगरी असलेले नांदाफाटा या शहरात महाराष्ट्र तिल नंबर 1 चे ब्रँड असलेले सक्सेस अबॅकस सेंटर चे उदघाट्न उत्सहात पार पडले.
एकाग्रता वाढविण्यासाठी तसेच मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यास हा कोर्स उपयुक्त असल्याचे पतिपादन सेंटर च्या संचालिका नेहा वासाडे यांनी यावेळी केले.
अबॅकस कोर्स पूर्ण केल्यानंन्तर विध्यार्थी संगणक व गणक यंत्रपेक्षा जलद गतीने गणिते सोडवितात. दोन ते नव्यानव पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात, तसेच येत्या 5 तारखेला राधेश्याम मंगल कार्यालयात विध्यार्थी व पालक वर्गा साठी अबॅकस बद्दलची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सक्सेस अबॅकस नांदा फाटा सेंटरच्या संचालिका नेहा वासाडे व संचालक प्रमोद खिरटकर यांनी यावेळी केले.
या संस्थेने सम्पूर्ण अभ्यासक्रम फक्त चार लेवल मध्ये पूर्ण केला आहे, अबॅकस बरोबर वैदिक गणित पद्धत मोफत शिकविले जातात. सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून माफक फि मध्ये व कमी कालावधीत मध्ये अबॅकसचे दर्जेदार शिक्षण विधार्थांना मिळणार असल्यामुळे या संस्थेची निवड करण्यात आली, असे सक्सेस अबॅकस नांदा फाटा सेंटर च्या संचालिका नेहा वासाडे व प्रमोद खिरटकर यांनी सांगितले.
या सेंटर चे उदघाट्न पि. एम. इमफ्रावेंचर्स च्या संचालिका पूर्णिमा श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले असून, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालय नांदाचे डॉक्टर संकेत शेंडे, नांदा येथील तलाठी विकास चिने, श्री शिवाजी इंग्लिश स्कुल च्या मुख्याध्यापक सौ. डिसुजा मॅडम, रत्नाकर चटप, एकलव्य इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक नितीन शेंडे, विठ्ठल टोंगे, श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाचे शिक्षक सचिन बोढाले, संदीप खिरकर,विनोद राठोड, नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, माजी उपसरपंच बंडू वरारकर, मुरलीधर बोडखे यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहून सक्सेस अबॅकस सेंटर नांदा फाटा च्या उदघाट्न कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..