बिरसा मुंडाचे संघर्षमय आदर्श समाज बांधवांनी जपावा – प्रविण गेडाम
150 व्या जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध उपक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र सरकार व आदिवासी विकास विभागाने प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत स्वातंत्र्य लढ्यातील मोलाची भूमिका बजाविणारे आदिवासीचे जननायक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाजात आहे.
जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी समाजात होऊन गेलेली थोर पुढारी, क्रांतिवीर, समाज सेवक यांचा इतिहास सदैव देश वाशियांना हृदयात साठवून राहावे करिता आणि त्यांची प्रेरणा आदिवासी समाज बांधवांना मिळत राहीवी याकरिता जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येत आहे.
सावली तालुक्यातील आदिवासी मुले आणि मुली यांच्या वस्तीगृहाच्या माध्यमातून जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी संस्कृती,रूढी ,परंपरा ,याचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखविण्यात आले
कार्यकमाला मार्गदर्शन करताना भगवान बिरसा मुंडा यांनी देशासाठी व आदिवासी समाज करिता दिलेल्या बलिदानाची यशोगाथा व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे आणि त्यांच्या वयाच्या अवघ्या 25वर्षातील संघर्षाचे युवकांनी आदर्शजपावा असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेची सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षा परचाके माजी जी प सदस्य, योगिता पेंदाम माजी जी प सदस्य, यांनी आदिवासी च्या क्रांतिकारकांचे कार्य सांगितले यावेळी यशवंत सीडाम साहेब, रवींद्र गजबिये गृहपाल, मनीषा साळवे गृहपाल , संतोष मडावी बाबूजी, विद्यार्थी प्रतिनिधी समीर मडावी,आदी उपस्थित होते
जनजातीय गौरव दिनानिमित्ताने दोन्ही वस्तीगृहात सामान्य ज्ञान स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले
सूत्र संचालन किरण गेडाम, व प्रणय मडावी यांनी केले.