“भाजपा प्रवक्त्याने राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीविरोधात घुग्घुस काँग्रेसचे संतप्त आंदोलन”

चांदा ब्लास्ट
केरळमधील भाजपाचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने संताप उसळला आहे. “राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू” असे वादग्रस्त विधान महादेवन यांनी केले.
या घटनेचा निषेध नोंदवित घुग्घुस शहर काँग्रेसने संतप्त आंदोलन केले. “राहुल गांधींच्या आधी आमच्या छातीत गोळ्या घाला” असे जाहीर आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केले.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप प्रवक्त्यांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, शेख शमिउद्दीन, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, जोया शेख, रोहित डाकूर, दिपक पेंदोर, सचिन नागपुरे, बालकिशन कुळसंगे, दिपक कांबळे, सुनील पाटील, शहशाह शेख, निखिल पुनघंटी, अरविंद चहांदे, कपील गोगला, अनवर सिद्दीकी, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या संतप्त आंदोलनामुळे घुग्घुस शहरात एकच खळबळ उडाली.