ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पुस्तके अपरिहार्य : डॉ.राजेश इंगोले

महिला विद्यापीठात डॉ. एस. आर. रंगनाथन पुण्यतिथी

चांदा ब्लास्ट

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एस एन डी टी महिला विद्यापीठ बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी रंगनाथन यांच्या जीवनावर भाष्य केले.यावेळी त्यांनी ग्रंथालयाचे महत्व आणि व्यक्तीच्या जीवनावर पुस्तकांचा प्रभाव यावर भाष्य करत वाचन संस्कृती जपण्याचा विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी, चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या स्मृतिदीनानिमित्त 27 सप्टेंबर रोजी एस एन डी टी महिला विद्यापीठ बल्लारपूर आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यापीठ आवारात वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी या उद्देश्याने पुस्तक-प्रदर्शनी आयोजित केली गेली, यांत विद्यापीठ ग्रंथालयातील विविध विषयांच्या पुस्तकांचा समृद्ध पुस्तक साठा प्रदर्शित केला गेला.

कार्यक्रमास बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सह कुलसचिव डॉ .बाळू राठोड , समन्वयक डॉ.वेदानंद अलमस्त, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनीं उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ ग्रंथालयात सह ग्रंथपाल स्नेहा लोहे व उज्वला शिंदे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये