पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील दारुविक्रेत्या महिलेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील दारुविक्रेती महोला नामे श्रीमती रुपा धर्मेन्द्र वासे वय ४५ वर्षे रा. तेलंगखडी, तहसिल यार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा हिचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाटचे अभिलेखावर सन २०१६ पासून महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकूण १९ गुन्हे नोंद आहे.
सन २०१६ पासुन स्थानबध्द महीला नामे रुपा धर्मेन्द्र वासे हिने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. तिच्या दहशतीमुळे अनेक पिडीत तिचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. रुपा धर्मेन्द्र बासे हिच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व तिची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने तिचे विरुध्द सन २०२२ मध्ये कलम ११० (ग) फौजदारी प्रकोंया संहीता, अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती व सन २०२५ मध्ये कलम ५६(१) (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांचेकडे सादर करण्यात आला होता परंतु स्थानबध्द महीलेचे वर्तणूकीत कोणताही बदल न घडून आल्याने व त्यानंतरही सतत गुन्हे करीत असल्याने व तिचेवर प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करणे असल्याने सदरचा प्रस्ताव खारीज करण्यात आला.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. देवेन्द्र ठाकुर पो.स्टे. हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा. हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मची सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन स्थानबध्द महीलेस अमरावती मध्यवती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये तिला अमरावती मध्यवती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, तसेच आगामी दुर्गा उत्सव, यसरा, दिवाळी याप्रकारचे सण उत्सव शांततेत पार पडावे या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मयी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.
सन २०२४ मध्ये एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानवध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो १५ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानवव्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात पो. हवा. अमोल आत्राम, पो. हवा. आशिष महेशगीरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. देवेंद्र ठाकुर, पोलीस अंमलदार पो. हवा. प्रविण देशमुख, विजय हारनुर, संग्राम मुंडे पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.