ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आक्रोश मोर्चात मोलाची कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे मुनाज शेख यांचा सत्कार

प्रदेशाध्यक्ष व शशिकांत शिंदे ह्यांच्या हस्ते 'प्रदेश कार्यालय, मुंबई' येथे सन्मानचिन्ह देऊन सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वतीने विराट असा ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ह्या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला शेतीप्रश्नांविषयीचा आक्रोश व्यक्त केला. अशा ह्या अतिप्रचंड मोर्चाच्या बांधणीत पक्षाच्या ज्या ज्या शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली अशा सर्व शिलेदारांना प्रदेशाध्यक्ष व आमदार माननीय श्री. शशिकांत शिंदे ह्यांच्या शुभहस्ते ‘प्रदेश कार्यालय, मुंबई’ येथे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. आपल्या नेतृत्वाने दिलेली ही कौतुकाची थाप ह्या सर्व शिलेदारांना भावी राजकय वाटचालीसाठी प्रोत्साहन देऊन गेली.

ह्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे ह्यांच्या शुभ हस्ते भद्रावती येथील पक्षाचे जेष्ठ नेते तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख यांचा मुंबई येथे आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी ऊलेखनिय कार्याकेल्या बद्दल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करन्यात आला.

यावेळी पक्षाचे माजीआमदार सुनिल भुसारा, प्रशांत बाबर सोलापूर,अतुल गय्यपवार गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस व प्रदेश पधअधीकारी मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थिती होतेअशा सर्व शिलेदारांना ‘आक्रोश मोर्चा’च्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी सन्मानित करण्यात आलं.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये