भद्रावतीच्या निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाने शैक्षणिक सत्र 2015 – 16 पासून उज्वल यशाची परंपरा प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात कायम ठेवली आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी झळकले आहेत या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत बीएससी ह्या अभ्यासक्रमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत कुमारी अनामिका लक्ष्मण चौधरी ही गुणाअनुक्रमांक 7 नम्रता प्रल्हाद लांजेवार गुणाअनुक्रमांक 8 वर आपले स्थान निश्चित केले आहे तसेच एमएससी भौतिकशास्त्र या अभ्यासक्रमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाच विद्यार्थ्यांमधून कुमारी राजश्री सुनील दीक्षित ही प्रथम आलेली आहे तसेच बीएससी अभ्यासक्रमातून वनस्पतीशास्त्र या विषयात कुमारी अनामिका लक्ष्मण चौधरी या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुण घेऊन विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे या संपूर्ण विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ लेमराज लडके यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील प्राध्यापवृदांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नाव रोशन करण्याची गेल्या 10-11 वर्षाची महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवीत यश संपादन केल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे सचिव डॉ. कार्तिक शिंदे सहसचिव डॉ. विशाल शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लेमराज लडके तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एका कार्यक्रमातून संपूर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना प्राचार्यांना व शिक्षकांना दिले आहे.