बालाजी महाराज यात्रा महोत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नवरात्र व बालाजी महाराज यात्रा उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.
जातीय सलोखा राखण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी आजच्या युवा पिढीला चांगले काय आणि वाईट काय हे सांगणे गरजेचे असल्याचे सांगितले, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी, नायब तहसीलदार डॉ संतोष मुंढे, तथा व विविध पोलीस ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते.
या सभेत रमेश नरोडे, प्रकाश खांडेभराड,प्रा विनायक कुळकर्णी, रमेश दादा कायंदे, दादा व्यवहारे, हाजी सिद्दिकी, संचित धन्नावत , ॲड मेहेत्रे, हनीफ शहा, जगदीश कापसे, सूरज गुप्ता यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या,
मिरवणुकीत डी जे चा वापर करू नये केल्यास पोलिस प्रशासन कारवाई करेल, यात्रा उत्सव मध्ये जागोजागी पोलिसांछ बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार असल्याचे अमोल गायकवाड यांनी सांगितले.
सभेचे प्रास्तविक उप विभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांनी केले, संचालन व आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी केले.
सभेला विविध दुर्गा उत्सव मंडळ चे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे सामाजिक संघटना चे नेते कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते