श्री संताजी अखिल तेली समाज संघटना कोरपणा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कोरपना जि.चंद्रपुरच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडवणीस साहेब यांना मार्फत तहसीलदार साहेब कोरपना जि.चंद्रपुर खालिल विषयावर मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तथा सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करूं नये.
हैद्राबाद गैझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR रद्द करण्यात यावा.असे निवेदन देण्यात आले.तो GR महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा तथा ओबीसी समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी आत्मघातकी असल्यांसारखा आहे.सात ते आठ कोटी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले तर 27% ओबीसी आरक्षण ते आताच्या परिस्थितीत ओबीसी समाजाला मिळणारे फक्त 17% मिळते त्यातही सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीचे आरक्षण नगण्य होऊन जाईल.
ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास मंदावेल. मराठ्यांचे आर्थिक मुल्यांकन होऊन ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही त्यांना कायद्यामध्ये सुधारणा करून स्वतंत्र 10% आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे.जर बिना आंदोलन करता सवर्ण समाजाला आरक्षण केंद्रशासन देऊ शकते तर मराठ्यांना का बरं नाही.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचारकरून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे.जेणैकरून ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही.
ओबीसी समाजाला न्याय मिळेल.अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कोरपना जि.चंद्रपुरच्या वतीने करीत आहोत.सरकारने निवेदनाला सकारात्मक घेऊन योग्य तो मार्ग काढुन न्याय द्यावा.श्री विजय लोहबडे संपर्क प्रमुख जिल्हा चंद्रपुर श्री सुनिल बावने तालुकाध्यक्ष श्री हरीश्चंद्र बावनकुळे कार्याध्यक्ष भारत गौरी उपाध्यक्ष उधवकुमार तडस,श्रीकांत खनके,प्रमोद बुटले,नारायण हजारे, पांडुरंग वरभे,रवी बुटले,सुरज बावनकुळे निवेदन देतांना उपस्थित होते.
पुढील कार्यवाईस निवेदन पाठवितो असे आश्वासन मा.तहसिलदार साहेब कोरपना जि.चंद्रपुर यांनी संघटनेला दिले.