ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूरच्या रेड रोज काॅन्व्हेटमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर येथील रेड रोज काॅन्व्हेट मध्ये करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य शहजादी अंसारी होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, तर योगतज्ज्ञ विनायक साळवे गुरूजी, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. श्रावण बानासुरे, मोईनुद्दीन अन्सारी, आरफिन अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख वक्ते बंडोपंत बोढेकर यांचा रेड रोज काॅन्व्हेट च्या वतीने सत्कार करण्यात आला.

निबंध स्पर्धेत विजेत्या स्पर्धक कु. क्वारिया शकुर यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आयोजन समितीच्या शिक्षिकांना सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले की , नव्या पीढीस सुसंस्कारित करणे हे राष्ट्रसंताचे साहित्य निर्मिती मागील एक महत्त्वाचे प्रयोजन होते. त्यांचे विचार आजच्या काळात सर्वांनाच दिशादर्शक आहे, असे ते म्हणाले.

दिग्दर्शक प्रास्ताविक डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले तर विनायक साळवे यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासाचे महत्त्व विषयावर विचार व्यक्त केले. प्राचार्य अन्सारी यांनी निबंध स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबाबत समितीस धन्यवाद दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया ठाकरे यांनी केले तर अर्चना काकडे यांनी आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये