ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी महाराज यात्रेतील सर्व रहाट पाळण्याची तपासणी इंजिनिअर द्वारे केल्यानंतरच सुरू करावे

छावा संघटनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री बालाजी महाराज यात्रा ची सुरुवात 8 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे, या यात्रेत 10 फुटापासून ते 100 फूट उंचीपर्यंत आकाश पाळणे येतात,या पाळण्याचे बऱ्याच ठिकाणी अपघात होऊन जिवीत हानी झालेली दिसून येत आहे. तेव्हा संभाव्य धोके लक्षात घेऊन देऊळगाव येथील यात्रेत येणाऱ्या आकाश पाळण्याची इंजिनिअर द्वारे इलेक्ट्रिक तपासणी करूनच सुरू करण्यात यावे अशी मागणी छावा संघटना, देऊळगाव राजा यांनी उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा, व पोलिस निरीक्षक देऊळगाव राजा यांच्या कडे निवेदनातून केली आहे. यात्रेमध्ये आकाश पाळण्याजवळ चिडिमारी होणार नाही याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे.

निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा चे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष राजे जाधव, दत्ता काळे, संभाजी नन्नावरे, संजय जाधव,अनिल घायाळ, विष्णू टाले, रामदास पवार, संदीप कटारे, अतिश राजे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये