ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरखल चक येथे गावात आलेला अस्वल जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 सावली वनपरिक्षेत्रातील विरखल चक गावात कालपासून ठाण मांडून असलेल्या व पहाटे एका घरात आश्रयास असलेल्या अस्वलास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले असून भयभीत असलेले गावाकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

         गायडोंगरी नियतक्षेत्रातील चकविरखल गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी ८ वाजताचे दरम्यान अस्वल चिंचेच्या झाडावर चढली. वनविभागाची टीम दाखल होऊन गस्तीवर असतांना आज पहाटे ५ वाजता चे सुमारास अस्वल झाडावरून उतरून वीरखल येथील भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली. गस्तीवर असलेल्या वनकर्मचारी यांनी तात्काळ सदर घराचे दरवाजे बंद केले व याबाबत वरिष्ठ वनाधिकारी यांना माहिती दिली. विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्व, घनश्याम नायगावकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, कु . इंगळे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर, रेस्कयू टीम चंद्रपूर यांनी सदरचे अस्वलास पिंजऱ्यात जेरबंद केले.

सदरचे कामी राखुंडे, क्षेत्र सहाय्यक व्याहाड, पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी, एकनाथ खुडे, वनरक्षक गायडोंगरी, वनरक्षक भोला सोनेकर, अविनाश नाने, महादेव मुंडे, डांगे, कराड, सुषमा मेश्राम व PRT निफंद्रा, गवरला, शिरसी व ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदरचे अस्वलास पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गावकऱ्यांनी अस्वल पकडल्याने सुटकेचा श्वास घेतलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये