ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परतीच्या पावसाने झोडपले उभ्या पिकाची नासाडी अतिवृष्टीचा शेतकऱ्याना फटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

    मोठ्या गौरवाने अन्नदाता बळीराजा  जगाचा पोशींदा म्हणत अविरत उन पाऊस थंडीच्या हुळहळीत न थांबणार कोरोना सारख्या संकटात सुद्धा सेवा देणारा शेतकरी शासकीय चुकीचे धोरण उत्पादणात घट कर्जबाजारी संकट डोक्यावर घेऊन कुटूंबाचा गाडा ओडणारा बळीराजा वरूण राज्याच्या अवकृपेने हातबल निराश होऊन हातात येणारा सोयाबीन शेतात सळत असल्याने लावले खर्च देखिल पदरात पडणार नाहीं कापसाचे बोंडे दसऱ्या च्या मुहर्तावर कापूस वेचणीचा आनंद व आर्थिक दोन पैसे हातात पडून दिवाळी सणाचे आनंद घेण्याचे स्वप्न पाहणारा बळीराजा आकाशा कडे पाहून डोळ्यात अश्रु गोठवित देवा काय गुन्हा केला परतीच्या पावसाने होत्याच नव्हता केला तुरीचे झाडे जागीच कुरमळले मुंग उडीद जमीनीत फस्त झाले कर्जाचा ओझ मानगुटीवर बसले बॅका उभ ठेवत नाहीं शावकार अवाढव्य व्याज घेऊन वेठीस धरतो कर्ज माफी जुमला झाला.

सरासरी पेक्षा जिल्हयात अधिक पाऊस झाल्याने बळीराजा हतबल झाला शेतकऱ्याच्या पाठीशी शासन उभे राहून आति वुष्टी ओला दुष्काळ जाहीर करूण सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी रब्बी लागवडी साठी चना करडी गहु बियाणे मोफत पुरविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली धनराज जिवने शरद जोगी डॉ कवडु पिपळकर विनोद जुमडे विकास टेकाम महादेव पेंदोर नारायण डोहे यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये