सांगोडा ग्रामपंचायत व सिमेंट कंपनीविरोधात दिनकर बोंडे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
उपोषणाचा पाचवा दिवस ; उपोषण कर्त्याची प्रकृती ढासळली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी एका सिमेंट कंपनी व ग्रामपंचायत सांगोडा यांच्या विरोधात २३ सप्टेंबर पासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाच दिवसाहून अधिकचा कालावधी लोटला आहे.यातच उपोषणकर्त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रांची चौकशी करून त्यांना रद्द करण्यात यावे. ग्रामस्थांची झालेली फसवणूक लक्षात घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. खदानीसाठी घेण्यात आलेल्या शेतजमिनींना योग्य मोबदला द्यावा, खदान क्षेत्रातील गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत न व्हावा. यासाठी पाईपलाईन स्थलांतरित करण्यात यावी, बेकायदेशीरित्या देण्यात आलेल्या कंपनीला गायरान जमिनीची चौकशी व्हावी
आदी त्यांच्या प्रमुख मागण्या आहे. या उपोषणाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभत असून दररोज मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शवत आहे. त्यामुळे उपोषणाची परिस्थिती लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.