कोरपणात सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त सामाजिक प्रबोधन सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे सत्यशोधक समाज स्थापना दिनाचे औचित्य साधून मा. हरिदासजी गौरकार यांनी आपल्या पत्नी स्मृतीशेष दुर्गाताई हरिदासजी गौरकार यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक प्रबोधन सभेचे आयोजन केले. या सभेत जुन्या रूढी-परंपरांना बाजूला सारून महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रबोधन करण्यात आले.
सभेला लोकसंघ – सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे कार्यकर्ते मा. नरेन गेडाम (चंद्रपूर), शिक्षण बचाव समन्वय समिती महाराष्ट्राचे समन्वयक मा. रमेश बीजेकर (नागपूर) आणि प्रा. सोज्वलताई ताकसांडे (सावित्रीबाई फुले ज्युनिअर कॉलेज, गडचांदूर) यांनी मार्गदर्शन केले. मा. हरिदासजी गौरकार, जे ओबीसी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना या सभेसाठी आमंत्रित करून त्यांना सामाजिक प्रबोधनाचे महत्त्व पटवून दिले.
सभेचे संचालन प्रा. देवराव ठावरी (कंवठाळा) यांनी उत्कृष्टपणे केले. प्रास्ताविक मा. हरिदासजी गौरकार यांनी केले, तर आभार मा. पांडुरंगजी तुमराम यांनी मानले. सभेला गौरकार परिवारातील नातेवाईक आणि मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरकार परिवार आणि शिक्षण बचाव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
मा. हरिदासजी गौरकार यांनी रूढी-परंपरांना झुगारून सामाजिक प्रबोधनाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.