ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पडोली ग्रामवासियांचे ठाणेदारांना समस्यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- पडोली येथील श्री गुरुदेव नगरवाशीयांनी पडोली येथे वाहतुकीबाबत व सर्विस रोडवर उभे असणारे अवैध ट्रक व वाहनांमूळे होत असलेला त्रास लक्षात आणून देत सदर रोडवर मोठेमोठे ट्रक व अन्य वाहने रस्त्यावर उभे करत असल्यामुळे येथील ग्रामवशीयांना होत असलेल्या त्रासाबद्दल निवेदन दिले सदर निवेदन म्हाडा कृती समिती नवीन चंद्रपूर यांच्यावतीने देण्यात आले. सदर निवेदन देताना मोठ्या संख्येने नगरवासीय उपस्थित होते. सदर निवेदन स्वीकारत येथील ठाणेदार योगेश हिवसे यांनी ही अवैध पार्किंग बंद करून नागरिकांना होत असलेला त्रास दूर करण्याची हमी दिली.

निवेदन देताना प्रफुल टोंगे,भाग्यवान गणफूले,प्रा. माधव कांडणगिरे, हरिभाऊ वानखेडे, शालिक वैरागडे, राजेश गहुकर,पवन धुडसे, सचिन बारसगडे,इकबाल कुरेशी,लाल बाबू यादव किशोर मासुरकर दिनेश चमाटे व आदी नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये