धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली शहरातील सोशल मीडियावर ग्रुप वर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुरुवारी दुपारी सावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सावली येथील आरोपी किशोर दुधे यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदू धर्माचा आराध्य दैवत दुर्गा माते बद्दल अपशब्द व अत्यंत हिन घाणेरडे संदेश सोशल मीडिया आज सकाळी 6.38 मिनिटांनी सावली शहर विकास समिती ग्रुप टाकलेला होता. सदर मॅसेज मुळे असंख्य हिंदू जणांच्या भावना दुखवून जातीय तेढनिर्माण केल्याबद्दल व सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल सदर व्यक्ती वर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी साठी सावली पोलीस स्टेशनवर शेकडो महिला, युवक व पुरुष जमा झाले.आरोपी ला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.
लोकांचा आक्रोश बघता पोलिसांनी आधीच आरोपी ला पोलीस ठाण्यात आणलेले होते.त्यामुळे आरोपी वर अटक करून कारवाई करा अशी मागणी शेकडो जणांनी केली व जय माता दि नारा दिला. जमा झालेल्या जनतेचे निवेदन सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लूरवार यांना देण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सावली पोलिसांनी आरोपी किशोर दुधे ला अटक करून अप. क्र.198/25 नुसार कलम 196(1)353(2),299 या कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.