
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती भागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला प्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या अनुलोम मित्र व प्रशासकीय अधिकारी यांचा परीचय वर्ग नुकताच तहसील कार्यालय कोरपणा येथे पार पडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मनरेगा विभाग,शिक्षण विभाग, पोलिस विभाग, पंचायत विभाग,आरोग्य अधिकारी,कृषी अधिकारी उपस्थित राहुन सदर विभागांतर्गत येणाऱ्या योजणांचे प्रारूप उपस्थितांना सांगितले.
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन लाभार्थ्यांनी योजणांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार पल्लवी आकरे यांनी केले.
गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण आपल्या परीने जनजागृती करा असे आवाहन पोलिस निरीक्षक गाडे यांनी केले.
यावेळी पंचायत समिती कोरपणा च्या प्रशासकीय विस्तूअधिकाऱ्यांनी व तालुका कृषी अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित अनुलोम मित्रांना मार्गदर्शन केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्निल टेंभे,तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकुर,निळकंठ काळे घरकुल विस्तार अधिकारी, दादाराव पवार समाजकल्याण विस्तार अधिकारी, विनोद गाडगे कृषी विस्तार अधिकारी,मधुकर टेकाम आरोग्य अधिकारी, डॉ तरोणे मैडम आरोग्य अधिकाऱ्यांनी संबोधित केले.
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) संस्थेचे सामाजिक कार्य सतिश मुसळे भाग जनसेवक राजुरा यांनी विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश खडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज येडे यांनी केले.कार्यक्रमाला राहुल डाखरे, जगदिश पेटकर,अभिषेक तुराणकर,कार्तिक गोन्लावार,पवन मुसळे,अंशुल पोतनुरवार,अतुल मालेकर,अजय झाडे, सरपंच विजय धानोरकर,अभय काकडे,ज्ञानेश्वर पावडे,पंकज डाखरे,शुभम काकडे,पवन मुसळे,मयुर सोनेकर, सरपंच कोहचाळे,विठ्ठल शेरकुडे,निखील नांदेकर यांचे सह तालुक्यातील अनुलोम मित्र उपस्थित होते.