कोचिंग क्लासेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरात शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत उंच भरारी घेऊन विद्यार्थी व पालकासमोर भविष्यात एक ब्रँड म्हणून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्राध्यापक विनायक फुके यांच्या आयसीआय कोचिंग क्लासेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थी हुशार आहे.
मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे विद्यार्थी हुशार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात ठेऊन स्वतःच्या क्लासेस मधील शिक्षणाची द्वारे खुली करून दिली आहे तर शहराच्या आसपासच्या गावातील ज्या शाळा आहे त्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्याचा निर्णय घेतला व दिनांक 23 सप्टेंबर रोजी बुटखेडा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय येथील दहा विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले याप्रसंगी या विद्यालयाचे प्राचार्य ए. बी.बनकर ,आयसीआय कोचिंग क्लासेस चे संचालक प्राध्यापक विनायक फुके, देशमुख सर, आयसीआय चे परमेश्वर पाचरणे, कोल्हे सर, दंडदाले सर, सानप सर, पिंपळे सर, हेलगे सर, उपस्थित होते.
विद्यार्थ्या सोबत संवाद साधत प्राध्यापक विनायक फूके सरांनी सांगितले की सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास हा प्रकार किती जीवघेणा ठरू शकतो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजून सांगितले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना कोणत्याही शाखेकडे वळावे मात्र हमखास यश प्राप्तीसाठी जिद्द व चिकाटी ठेवून ध्येय निश्चिती ठरवावी असे सांगितले.